News Flash

केंद्रीय पथक उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ४ हजार कोटींची आíथक मदत मिळावी, या राज्य सरकारच्या निवेदनाची छाननी करण्यासाठी २० व २१ नोव्हेंबरला केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ४ हजार कोटींची आíथक मदत मिळावी, या राज्य सरकारच्या निवेदनाची छाननी करण्यासाठी २० व २१ नोव्हेंबरला केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. केंद्रीय फलोत्पादन आयुक्त एस. के मल्होत्रा पथकाचे प्रमुख असून पथकातील १० अधिकाऱ्यांना तीन चमूमध्ये विभागून मराठवाडय़ातील ८ जिल्हे, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक तसेच सोलापूर जिल्ह्यांत पाहणी करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतर शेतकरी मदतीचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले जाते.
मराठवाडय़ात सलग चार वर्षांपासून दुष्काळ आहे. या वर्षी तब्बल ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके पूर्णत: वाया गेली. नजर पसेवारीनंतर राज्य सरकारने किती मदत लागू शकते, याचा अंदाज करून सुमारे ४ हजार कोटी रुपयांची आíथक मदत मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी हे पथक लवकरच पाहणी दौऱ्यावर येईल, असे सांगितले होते. १८ ते २३ नोव्हेंबरदरम्यान हा दौरा होईल, असे सांगितले जात होते. दुष्काळ पाहणीचे पथक उद्या (गुरुवारी) औरंगाबाद येथे येणार असून विभागातील दुष्काळाच्या तीव्रतेची माहिती त्यांना शुक्रवारी सकाळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट देतील. त्यानंतर ही दोन पथके मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जातील. रविवारी पथक त्यांचा अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण करेल.
कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून मराठवाडय़ात आतापर्यंत ९४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळामुळे चारा टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले होते. या बरोबरच पिण्याच्या पिण्यासाठी १ हजारांहून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. या पाश्र्वभूमीवर किती आíथक मदत देता येईल याची चाचपणी केली जाणार आहे. नसíगक आपत्तीच्या निकषानुसार कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ६ हजार ८०० ते बागायतदार शेती नुकसानीसाठी १३ हजार ५०० रुपये मदत मिळण्याची शक्यता आहे.
खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर रब्बी हंगामही पावसाअभावी अडचणीत आहे. शेतकरी हवालदिल आहे. गेल्या तीन वर्षांत सरकारकडून हेक्टरी मदतही देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2015 1:20 am

Web Title: marathwada tour of central team for survey of drought
टॅग : Drought,Survey
Next Stories
1 उमरी पालिकेतील गैरकारभाराच्या चौकशीचा अहवाल-फाईल गायब!
2 मंत्रिपदासाठी निलंगेकर व भालेराव यांची चर्चा!
3 ‘लग्न होऊनही एकटेच राहा’
Just Now!
X