औरंगाबाद महानगपालिकेला रस्ते कामासाठी आलेल्या शंभर कोटींच्या निधीचे पडसाद आज जिल्हा दक्षता सनियंत्रण समितीच्या बैठकीत पहायला मिळाले. बैठकीसाठी महापौर आल्यानंतर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी शंभर कोटीवाले ‘महापौर’ आले असा टोमणा मारला.

पालिका सभागृहात शंभर कोटींच्या निधी वरून शिवसेना भाजपमध्ये श्रेयवाद रंगला आहे. निधी मिळाल्यानंतर भाजपने फक्त भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला होता. त्यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. शिवसेना नगरसेवकानी सभात्याग केला. त्यानंतर दुसऱ्या सभेत शिवसेनेने ठराव मांडण्याची मागणी केल्यानंतर “सोन्या तुझा आमच्यावर भरोसा नाय काय?” अशी कोटी भाजप नगरसेवकानी केली होती. पालिकेत हे राजकारण सुरु असतना शनिवारी जिल्हा दक्षता सनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी शंभर कोटीवाले महापौर असा टोमणा मारला.

महापौरांच्या ‘विंचू चावला’ भरुडाचीही चर्चा

विंचू चावला भारुडावर महापौर भगवान घडमोडे यांनी केलेले नृत्य खूप व्हायरले झालं होते. आज त्याचीही चर्चा रंगली. महापौरांना शंभर कोटीवाले महापौर म्हटल्यानंतर बैठकीतील एका अधिकाऱ्याने महापौर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याचा विषय लढला. त्यावर वीणा, टाळ, चिपळ्या न घेता भारुड म्हणल्याची टिप्पणी खासदार खैरे यांनी केली. महापौरांनी हसून साऱ्याला प्रतिसाद दिला.

सोनू तुला भरोसा नाय का?

रस्त्याच्या खड्डयावरन सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गाण्याचा दाखला खासदार चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. खड्डे पडले तर अशी टीका होते. त्यामुळे ते पडू देऊ नका हे सांगण्यासाठी सोनूच्या गाण्याच उदाहरण खैरे यांनी दिले.