औरंगाबाद महानगरपालिकेच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील सिद्धार्थ उद्यानात बच्चे कंपनीसाठी उंट सफारी सुरु करण्यात आली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर विजय औताडे यांनी स्वतः उंटावर स्वार होऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला.

शहरातील सर्वात मोठं उद्यान आणि प्राणी संग्रहालय असलेल्या सिद्धार्थ उद्यानात मोठी गर्दी असते. त्यामध्ये बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात येते. त्यांच्यासाठी उंट सफारीची खास सोय पालिकेकडून करण्यात आली. त्यासाठी दोन उंट उद्यानात ठेवण्यात आले आहेत. पालिकेच्या वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शहरातील नागरिकांना पहिले तीन दिवस मोफत सवारी करता येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शुभारंभाच्या दिवशी उद्यानातील उंट सफारीचा आनंद घेतला.

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

उंट सवारी सुरु करण्यापूर्वी याठिकाणी रेल्वे सफरीचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अवघ्या काही दिवसातच या उपक्रमाची दुरावस्था झाली. त्यामुळे उंट सफारीचा उपक्रम  किती दिवस सुरू राहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.