19 October 2019

News Flash

मानसिक आजाराने ग्रासलेल्या महिलेवर बलात्कार

पीडितेच्या बहिणीला हा प्रकार लक्षात आला. शेवटी 26 डिसेंबर रोजी नेमके काय घडले, हे पीडितेने बहिणीला सांगितले.

संग्रहित छायाचित्र

घराच्या जागेचे काम करुन देतो, असे सांगत एका अज्ञात व्यक्तीने मानसिक आजाराने ग्रासलेल्या महिलेवर बलात्कार केल्याची धटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या एका महिलेला मानसिक आजाराने ग्रासले आहे. या महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला आहे. घराच्या जागेचे काम करुन देतो, असे सांगत त्या व्यक्तीने घरात प्रवेश केला. बलात्काराच्या दोन ते तीन दिवसानंतर पीडितेला त्रास होऊ लागला. पीडितेच्या बहिणीला हा प्रकार लक्षात आला. शेवटी 26 डिसेंबर रोजी नेमके काय घडले, हे पीडितेने बहिणीला सांगितले. यानंतर तिने पीडितेला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.  पिडीतेला आरोपीचे वर्णनही करता येत नाही आणि नावही माहित नाही, त्यामुळे नराधमाचा शोध घेणे कठीण जात आहे. या प्रकरणाचा  पुढील तपास पोलिस निरीक्षक राजश्रि आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेख सरवर करत आहेत.

First Published on January 3, 2019 12:31 am

Web Title: mentally challenged woman raped accused absconding