28 October 2020

News Flash

संकटकाळी शरद पवारच; विरोधक बिहारमध्ये

मंत्री धनंजय मुंडेंची भाजपवर टीका

बीड  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकांच्या नुकसान भरपाईची पाहणी करताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे. समवेत जिल्हाधिकारी व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

मंत्री धनंजय मुंडेंची भाजपवर टीका

बीड : सत्ता असो किंवा नसो, राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठीच बांधावर आहोत आणि विरोधक मात्र बिहारमध्ये निवडणुकीत व्यस्त आहेत. संकटकाळी शरद पवारच धावून येतात असे स्पष्ट करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील हिरापूर, ईटकूर, मिरकाळा, मादळमोही (ता.गेवराई) येथे रविवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणी केली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते. कापूस, सोयाबीन आणि आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुंडे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करुन पंचनाम्याबाबत माहिती घेतली. यावेळी मंत्री मुंडे म्हणाले, जिल्ह्याला नेहमीच दुष्काळाचा फटका बसतो. यावर्षी खरीप हंगामातील पिके तिसऱ्यांदा अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत.  राज्य सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारच आहे. मात्र, त्यांना विमा देखील मिळाला पाहिजे. जिल्ह्यातील १७ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरलेला आहे. कृषी विभागाच्या यंत्रणेने केलेले पंचनामे ग्रा धरुन विमा कंपनीने भरपाई द्यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत असो किंवा नसो नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने शरद पवारच उभे राहतात असे धनंजय मुंडे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:12 am

Web Title: minister dhananjay munde criticized bjp leaders zws 70
Next Stories
1 राज्यात रक्ताचा पुन्हा तुटवडा!
2 मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध कमी करण्यासाठी आंदोलन
3 गरिबांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन कमी किमतीमध्ये
Just Now!
X