News Flash

मुख्यमंत्री वेळ देत नसल्याची आमदार बंब यांची तक्रार

मराठवाडय़ातील विविध प्रश्नावंर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात वारंवार दूरध्वनी केले

मुख्यमंत्री वेळ देत नसल्याची आमदार बंब यांची तक्रार

औरंगाबाद : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊन पावणेदोन वर्षे झाल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळ देत नसल्याची तक्रार गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली असून प्रश्न मांडण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर करावा लागत आहे. करोना काळात आणि त्यानंतरही विकासकामे ठप्प असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

मराठवाडय़ातील विविध प्रश्नावंर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात वारंवार दूरध्वनी केले. त्यांच्या स्वीय साहाय्यकांकडून भेटीसाठी बोलावले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून वेळ मिळाला नाही. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न पोहोचविण्यासाठी तसेच विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्र मंत्रालयात फिरले तर कामाची गती वाढते, असा अनुभव आहे. मात्र, ते वेळ देत नसल्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे आमदार बंब म्हणाले. समाजमाध्यमातून त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. गेल्या काही महिन्यापासून संपर्क करून थकलो त्यामुळे समाजमाध्यमातून चर्चा घडवून आणल्याचा दावा प्रशांत बंब यांनी केला. मराठवाडय़ातील विकासाचे प्रश्न रखडत असल्याचेही त्यांनी सांगितले. काही प्रकरणे गंभीर असतात, ती थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगणेच इष्ट असते पण ते वेळच देत नसल्याचे आमदार बंब म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 1:45 am

Web Title: mla prashant bomb complains about cm for not giving time zws 70
Next Stories
1 पैठण संतपीठाच्या रचनेतील बदलामुळे नाराजी
2 पदवीधरांसाठी पहिल्या सत्रात भारतीय संविधान अनिवार्य विषय
3 बँकांचे एकत्रीकरण हा वित्तीय दोष दुरुस्तीचा मार्ग
Just Now!
X