08 March 2021

News Flash

आईने उराशी कवटाळून धरलेल्या बाळाचा गुदमरुन मृत्यू

कविताने बाळाचा मृतदेह वाळूत पुरला. यावर कळस म्हणजे, तिने पती व दिरानेच मुलाची हत्या केल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस तपासात महिलेचे बिंग फुटले.

प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात नवरा- बायकोच्या वादात चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी आईने उराशी कवटाळून धरलेल्या बाळाचा गुदमरुन मृत्यू झाला असून मृत्यूनंतर महिलेने बाळाचा मृतदेह वाळूत पुरला होता. पती व दिरानेच मुलाची हत्या केल्याचा कांगावाही तिने केला. मात्र, पोलीस तपासात महिलेचे बिंग फुटले व पोलिसांनी तिला अटक केली.

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे राहणाऱ्या कविता मोरे या महिलेचा पतीशी वाद झाला. या वादानंतर घरात सासरची मंडळी झोपलेली असताना कविता तिच्या बाळाला घेऊन घरातून निघून गेली. घरातून निघताना बाळाच्या रडण्याचा आवाज कोणाला येऊ नये म्हणून तिने बाळाला उराशी कवटाळून धरले. मात्र, यात बाळाचे नाक आणि तोंड दाबले गेल्याने बाळाचा गुदमरुन मृत्यू झाला. कविताला काही वेळातच हा प्रकार लक्षात आला. मात्र, तोवर उशीर झाला होता. कविताने बाळाचा मृतदेह वाळूत पुरला. यावर कळस म्हणजे, तिने पती व दिरानेच मुलाची हत्या केल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणात संदीप मोरे व काका किशोर मोरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, घटनास्थळाचा पंचनामा, बाळाचा शवविच्छेदन अहवाल आणि जबाब यावरुन पोलिसांना कवितावरच संशय आला. त्यांनी कविताची कसून चौकशी करताच तिने घडलेल्या कृत्याची माहिती दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून न्यायालयाने तिची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 2:17 pm

Web Title: mother charged in accidental suffocation death of child in sillod
Next Stories
1 राष्ट्रवादीशी आघाडीबाबत महिनाभराने पुन्हा चर्चा -चव्हाण
2 BLOG: भाजपाचा महामेळावा आणि बेभाव शेतकरी !
3 कोटय़वधींच्या भूखंडांचा राजकीय खेळ
Just Now!
X