सासऱ्यास स्टम्पने बेदाम मारहाण करून खून करणाऱ्या जावायास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दोषी ठरवून जन्मठेप, ५ हजार रुपये दंड ठोठविला. पडेगाव म्हस्के कॉलनीत राहणारा साहेबराव गंगधर महापुरे हा सासूबाईचे निधन झाल्यामुळे त्यांच्या तेरवीच्या कार्यक्रम ८ सप्टेंबर २०१६ रोजी असल्यामुळे  चार जावई आणि मुली मध्यवर्ती बसस्थानक जवळ असलेल्या गरमपाणी भागात आले होते.

रात्री जावई साहेबराव आणि सासरे बाबुराव देवराव जाधव (६५) रा. गरमपाणी यांच्या मध्ये शाब्दीक वाद झाला. तो वाद विकोपाला गेला आणि एकमेकांना शिवीगाळ करत होते. याचा राग आल्यामुळे संतापलेला  जावाई साहेबराव महापुरेने घरातील लाकडी स्टम्प मारण्यासाठी घेतल्यामुळे सासरा घराच्या बाहेर पळू लागला. सासरा पुढे आणि जावई मागे पळत होता. गल्लीमध्ये जावायने अडवून स्टम्पने मारहाण केली. मध्यरात्री घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांने क्रांतीचौक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बाबुराव जाधव यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालवल्यामुळे खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असताना जाधव यांचा १४ सप्टेंबर २०१६ रोजी मरण पावला. मृत जाधव यांची मुलगी सरिता गोरे यांच्या तक्रारीवरुन साहेबराव महापूर विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या खून खटल्याची अंतिम सुनावणी झाली असता मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. दोघे जण फितूर झाले. जाधव यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने  साहेबराव महापुरेला दोषी ठरवून जन्मठेप, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजूरीची शिक्षा ठोठवली. देशपांडे यांना अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.