21 October 2019

News Flash

काँग्रेस, राष्ट्रवादीला मुस्लीम मतदारांचा धसका!

भाजपा व एमआयएम हे दोन पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

काँग्रेस-राष्ट्रवादी

भाजपा व एमआयएम हे दोन पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे घासून गुळगुळीत झालेले तुणतुणे निवडणूक प्रचारार्थ एकाच वेळी काँग्रेस व राष्ट्रवादीने वाजवणे सुरू केले असून मुस्लीम मतांच्या फुटीचा दोन्ही पक्षांनी चांगलाच धसका घेतल्याचे निवडणूक प्रचारसभांमधून दिसून येत आहे.

जिल्हय़ातील औसा, निलंगा, अहमदपूर व उदगीर या चार ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने अहमदपूर व औसा या दोन ठिकाणी मुस्लीम उमेदवारांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. एमआयएमने सर्व ठिकाणी आपली शक्ती पणाला लावून मुस्लीम मताच्या एकजुटीवर लक्ष केंद्रित केल्याने व मुस्लीम समाज न बोलता संघटित होत असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष चांगलेच चिंतेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या जिल्हय़ात सभा झाल्या व दोघांनीही अगदी ठरवून बोलत आहोत, याप्रमाणे एमआयएम व भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एमआयएमला मत म्हणजे भाजपाला मत. मुस्लीम मताच्या विभाजनासाठी एमआयएमचे उमेदवार िरगणात असल्याची टीका केली. राष्ट्रवादीच्या या टीकेला एमआयएमने चोख उत्तरही दिले आहे. महाराष्ट्रात सरकारला बिनशर्त पािठबा एमआयएमने दिला होता की राष्ट्रवादीने? नरेंद्र मोदींचे कौतुक ओवेसीने केले की शरद पवारांनी? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. उदगीरमध्ये एमआयएमने आ. अकबर ओवेसी व आ. इम्तियाज अली यांची प्रचाराच्या शुभारंभाची मोठी सभा घेतली. औसा व उदगीर या दोन ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या ही नगराध्यक्ष कोण होणार हे ठरवणारी आहे.

बीड नगरपालिकेत एमआयएमने आपली शक्ती दाखवून दिल्यामुळे व याच पध्दतीने मराठवाडय़ात एमआयएमने पक्षबांधणी सुरू केल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. निवडणुकीतील हा पराभव समोर दिसत असताना निवडणुकीनंतर पराभवाचे खापर फोडण्यासाठी मुद्दा हवा यासाठी निवडणूकपूर्व तयारी म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजपा व एमआयएम हे दोन पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मांडणे सुरू केले आहे. अर्थात दोन्ही पक्षाच्या मतदारांना या टीकेच्या मागील गुपित माहीत असल्यामुळे त्यांच्या मतदारांवर या वाक्याचा कोणताही परिणाम होणार नाही हे स्पष्ट आहे. १४ डिसेंबर रोजी मतदान आहे. तोपर्यंत या मुद्यावरून कोण काय बोलतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

First Published on December 11, 2016 1:02 am

Web Title: muslim voters and congress party ncp