News Flash

देवत्व देऊ नका आम्हा, सर्वसामान्यच ठेवा- नाना, मकरंद

नाना आणि मकरंद यांच्या 'नाम' संस्थेचा औरंगाबाद येथे कार्यक्रम, दोन गावे दत्तक

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेकडून दोन गावे दत्तक.

देवत्व देऊ नका आम्हा, सर्वसामान्यच ठेवा. सर्वांचेच पाय मातीचे असतात, असे उद्गार अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात काढले. नाना आणि मकरंद यांनी शेतकऱयांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘नाम’ या संस्थेच्या अंतर्गत औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाना, मकरंद यांनी शेतकऱयांना सढळ हस्ते मदत देऊ केली. औरंगाबाद जिल्ह्यातील धुंदल आणि वर्ध्यातील आमला ही गावे ‘नाम’ या संस्थेकडून ग्रामविकासासाठी दत्तक घेत असल्याचे नाना आणि मकरंद यांनी जाहीर केले. तसेच आगामी काळात दुष्काळ निर्मुलन, ग्रामीण विकासासोबतच गाव आणि शहरांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याचे उद्दीष्टही त्यांनी स्पष्ट केले. नाम या संस्थेने १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केल्याचेही अनासपुरे यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2015 5:32 pm

Web Title: nana patekar and makarand anaspure helps farmers in aurangabad
टॅग : Nana Patekar
Next Stories
1 ‘अल्पसंख्याक कल्याणास भाजपचे सरकार कटिबद्ध’
2 मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी हस्ताचा दमदार पाऊस
3 नाना-मकरंद आज औरंगाबादेत
Just Now!
X