News Flash

खड्ड्यात पडलेल्या वडिलांना वाचवताना मुलाचाही मृत्यू

चिकना येथील शेतकरी शेख चांदपाशा खाजामियां (वय ५५) यांनी आपल्या शेतात तंबाखूचे पीक लावले होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

तंबाखूच्या पिकाला धूर देत असताना तोल जाऊन खड्ड्यात पडलेल्या वडिलांना काढताना मुलाचाही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी धर्माबाद तालुक्यातील चिकना येथील शेतात घडली.

चिकना येथील शेतकरी शेख चांदपाशा खाजामियां (वय ५५) यांनी आपल्या शेतात तंबाखूचे पीक लावले होते. या तंबाखूच्या पिकास रविवारी रात्रीपासून धूर देण्याचे काम करीत असताना शेख चांदपाशा यांचा तोल जाऊन ते खड्डय़ात पडले. वडिलांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी मुलगा वंशोद्दीन प्रयत्न करत असताना त्याचाही तोल गेला. तोही खड्ड्यात जाऊन पडल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

घटनेची माहिती पोलीस व महसूल प्रशासनास देण्यात आली.  करखेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 5:04 pm

Web Title: nanded father son dies in accident
Next Stories
1 दुष्काळामुळे लग्नातील अवाजवी खर्च टाळण्याकडे कल
2 तूरडाळ व्यवहारातून १४ लाखांची फसवणूक
3 पोलीस अधिकाऱ्याच्या सुनेने अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करुन घेतला गळफास
Just Now!
X