News Flash

अंधुरेच्या पत्नीची याचिका निकाली

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

संग्रहित छायाचित्र

‘अंनिस’चे नरेंद्र दाभोलकर हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सचिन अंधुरे याच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. हर्सूल कारागृहाच्या प्रशासनाने अंधुरेच्या जिवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, अशी हमी दिल्याने न्या. रवींद्र घुगे आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी याचिका निकाली काढली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येच्या आरोपाखाली औरंगाबाद येथील सचिन अंधुरे याला अटक केला असून तो पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत होता. तेथून हर्सूल कारागृहात हलवून इतर कैद्यांसोबत त्याला ठेवण्यात आले आहे. यामुळे आपल्या पतीच्या जीविताला धोका निर्माण होऊ  शकतो, अशा आशयाची याचिका सचिन अंधुरे याची पत्नी शीतल अंधुरेने अ‍ॅड. एस. एम. कुलकर्णी यांच्या मार्फत खंडपीठात दाखल केला. या याचिकेवर सुनावणी झाली असता कारागृह प्रशासनाने सचिन अंधुरेच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची हमी दिल्याचे सरकारी वकील अ‍ॅड. डी. आर. काळे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:08 am

Web Title: narendra dabholkar murder case andhures wifes petition settled abn 97
Next Stories
1 औरंगाबादमध्ये तलाव दिसल्यानंतर झाला पोहण्याचा मोह, पाच मित्र पाण्यात उतरले पण त्यानंतर…
2 करोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातूनच ठोकली धुम; जिल्हा व पोलीस प्रशासनाची उडाली झोप
3 औरंगाबाद विभागाची बारावीनंतर दहावी निकालातही घसरण
Just Now!
X