हाती भागवत पताका, टाळ-मृदंगाचा गजर, मुखी एकनाथ-भानुदासाचे नाव घेत लाखो भाविक नाथषष्ठीनिमित्त पठण येथे दाखल झाले. गोदावरीचे पात्र पहिल्यांदाच कोरडे पडल्याने थेट नाथसागरात जाऊन वारकऱ्यांनी स्नान केले. सुमारे साडेचार लाख भाविकांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तीन दिवस महाराष्ट्र-कर्नाटकातून अनेक वारकरी िदडय़ा या सोहळय़ासाठी पठण येथे येतात. नाथांच्या भारुडासह अभंगामुळे पठणनगरी फुलून गेली होती.
या वर्षी दुष्काळामुळे येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत काहीशी घट झाली. संत एकनाथ यांच्या राहत्या वाडय़ातून दुपारी मानाच्या िदडीने उत्सवाला सुरुवात झाली. मुक्कामी आलेले भाविक भजन-कीर्तनात दंग होते. शेकडो मलाचा पायी प्रवास करून आलेल्या भाविकांनी नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि थकल्या जिवाला अपूर्व आनंद मिळाल्याचे सुख वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. साडेचारशेहून अधिक िदडय़ा नाथनगरीत आल्या असल्याचे सखाराम महाराज संस्थानचे वासकर यांनी सांगितले. औरंगाबाद-बिडकीन-ढोरकीन माग्रे काही िदडय़ा आल्या, तर मुंबई-कल्याण-आळेफाटा-अहमदनगर माग्रेही काही िदडय़ा आल्या. कोल्हापूर, लातूर, सोलापूर, तुळजापूर, बीड या मार्गाहूनही अनेक िदडय़ा आल्या.
पठण शहराला दक्षिण काशी मानले जाते. तीन दिवसांच्या सोहळय़ात पहाटे साडेपाच वाजता नाथ प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यानंतर दर्शन, दुपारी महाप्रसाद व रात्री कीर्तन-प्रवचन आदी कार्यक्रम होतात. गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे धरणावर जाऊन वारकऱ्यांनी स्नान केले. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व जलतरणपटूंची सुरक्षा तैनात केली होती. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून नाथ पादुकांच्या दर्शनासाठी लागलेली रांग एक किलोमीटपर्यंतची होती. मंगळवारी दिवसभरात भाविकांची रांग वाढतच होती. पिण्याचे पाणी व इतर सुविधा प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या.