उस्मानाबाद बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीनेच बाजी मारली. तुळजापूर, भूम बाजार समित्यांनंतर उस्मानाबादेत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले. उस्मानाबाद बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक १५ जागा मिळाल्या. या पाठोपाठ काँग्रेसला २ व शिवसेनेला एका जागेवर विजय मिळवता आला. निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या सर्व उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. उस्मानाबाद बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी शेतकरी विकास पॅनेल, तसेच काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षविरहित आघाडीतून स्थापन केलेल्या शेतकरी विकास पॅनेलची अटीतटीची लढत झाली. १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलसह अपक्षांमधून एकूण ४४ उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. बाजार समितीवरील राष्ट्रवादीची सत्ता उलथावून टाकण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व भाजप उमेदवारांनी एकत्रित लढा दिला. मात्र, या आघाडीला बहुतांश उमेदवार अपेक्षित मिळाले नाहीत. राष्ट्रवादीने कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी न करता स्वबळावर लढा दिला. तन, मन आणि धनाने कामाला लागलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात यश मिळाले. बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. ९२.९४ टक्के मतदान झाले. मंगळवारी सकाळी महसूल भवन येथे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. ए. िशदे यांनी, तर सहायक म्हणून ए. आर. सय्यद यांनी काम पाहिले. निवडणूक निकालानुसार सोसायटी सर्वसाधारण, महिला राखीव, भटक्या जाती-विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय मतदारसंघातील एकूण ११पकी सर्व ११ जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या. ग्रामपंचायत सर्वसाधारण, आíथकदृष्टय़ा दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील चार जागांवरही राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले. सोसायटी व ग्रामपंचायतीच्या १५ जागा राष्ट्रवादीने मिळवल्या, तर उर्वरित व्यापारी मतदारसंघातील दोन जागा काँग्रेस व हमाल मापाडी मतदारसंघातील एका जागेवर शिवसेनेने विजय मिळवला.
भाजपच्या एकाही उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. या निवडणुकीने केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-सेनेच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांवर आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. भाजप-सेनेच्या तुलनेत काँग्रेसने अधिक जागा मिळवल्या असल्या, तरी काँग्रेसवरही या निवडणुकीने आत्मपरीक्षणाची वेळ आणली आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ- निहाल कलीमोद्दीन काझी, तानाजी गायकवाड, बाळासाहेब घुटे, श्याम जाधव, दत्तात्रय देशमुख, उद्धव पाटील, व्यंकट पाटील (सर्व राष्ट्रवादी), सोसायटी महिला राखीव मतदारसंघ- रोहिणी नाईकवाडी, रत्नमाला सिनगारे (राष्ट्रवादी), सोसायटी भटक्या जाती/विमुक्त जमाती मतदारसंघ- युवराज िशदे (राष्ट्रवादी), सोसायटी इतर मागासवर्गीय मतदारसंघ- जीवन हिप्परकर (राष्ट्रवादी), ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ- बबिता माने, अरुण वीर (राष्ट्रवादी), ग्रामपंचायत आíथकदृष्टय़ा दुर्बल घटक मतदारसंघ- दयानंद भोईटे (राष्ट्रवादी), ग्रामपंचायत अनु. जाती-जमाती मतदारसंघ- गोपाळ आदटराव (राष्ट्रवादी), व्यापारी मतदारसंघ- श्रीमान घोडके, सतीश सोमाणी (काँग्रेस), हमाल मापाडी मतदारसंघ- अविनाश चव्हाण (शिवसेना).

Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
pm modi on yavatmal visit to launch development projects attend public programme
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये; महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
Manoj Jarange Patil
“मनोज जरांगे बीड लोकसभेसाठी मविआचे उमेदवार असणार”, ‘या’ भाजपा नेत्याचा मोठा दावा