28 September 2020

News Flash

कर्जमाफी, शुल्कमाफीसाठी राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ होण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.

दुष्काळग्रस्त जिल्ह्यतील शेतकऱ्यांना कर्जमाफी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ होण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, सरकार या मागणीची दखल घेत नाही. येत्या ५ जूनपर्यंत या बाबत निर्णय न झाल्यास ७ जूनपासून जिल्हाभर पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. १६ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.
नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. जानेवारीपासून आजतागायत मराठवाडय़ात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या उस्मानाबाद जिल्ह्यात झाल्या आहेत. सरकारने जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी, तसेच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पशाअभावी खंड पडू नये या साठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. हिवाळी अधिवेशनापूर्वी जिल्ह्यात १० हजार विद्यार्थ्यांच्या सह्य़ांनिशी शैक्षणिक शुल्कमाफीच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मात्र, या बाबत सरकारने भूमिका स्पष्ट न केल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये नराश्य आणि संतापाचे वातावरण आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीतर्फे ५ जूनपर्यंत सरकारला या बाबत निर्णय घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी सरकारने निर्णय न दिल्यास ७ जूनपासून प्रत्येक तालुका स्तरावर पालक, विद्यार्थी आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकत्रे साखळी पद्धतीने उपोषण करतील. त्यानंतर १६ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाभरातील पालक, विद्यार्थ्यांसमवेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकत्रे व आपण उपोषण करणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 2:56 am

Web Title: ncp warning agitation for farmers debt relief and students fees exemption
टॅग Ncp
Next Stories
1 पीककर्जासाठी बँकांत शेतकऱ्यांचे खेटे सुरूच
2 विहीर खोदकाम करताना क्रेन तुटून दोन मजूर ठार
3 पैशासाठी पित्याची निर्घृण हत्या; दोन मुलींसह जावयाला अटक
Just Now!
X