21 February 2019

News Flash

पवारांच्या सभेत गोंधळ; आमदार बंब यांचा निषेध

या वेळी आमदार बंब यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ास साडी नेसवून लाथा मारून निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पठणगेट येथे रविवारी आंदोलन करण्यात आले.

प्रतीकात्मक पुतळय़ाला साडी नेसवली

हल्लाबोल मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणारे तीन कार्यकर्ते आमदार प्रशांत बंब समर्थक असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पठणगेट येथे रविवारी आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार बंब यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ास साडी नेसवून लाथा मारून निषेध करण्यात आला. पोलिसांनी झटापट करून बंब यांचा पुतळा जप्त केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविषयी काही बोलल्यास औरंगाबाद शहरात फिरू न देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांचा वतीने देण्यात आला.

या प्रसंगी युवक कार्याध्यक्ष शेख कय्युम अहमद, विद्यार्थी प्रदेश सचिव अक्षय पाटील, शेख सलीम एसएस, शेख इस्माईल राजा, संदीप जाधव, अक्षय शिंदे, सूरज लोंढे, सचिन भाबत, दिनेश नवगिरे, बादशाह अन्सारी, अय्याज खान, अजिंक्य बोराडे,गणेश पवार, इम्रान हैदर, शेख शोएब, अमृत भांबळे, अल्ताफ मिर्झा, इरफान शेख सिकंदर, आमीर जहागीरदार, शेख जावेद, अमजद खान, इरफान कुरेशी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कार्यालय फोडल्याची चर्चा

औरंगाबाद शहरात दुपारनंतर जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेले सिंधी कॉलनीतील गुरुद्वारासमोरील आमदार बंब यांचे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र असा प्रकार घडला नसल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांनी दिली. कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी येऊन निदर्शने केल्याची माहिती आहे.

First Published on February 5, 2018 1:54 am

Web Title: ncp workers protest against bjp mla prashant bamb for disturbing pawar meeting