23 January 2018

News Flash

पक्ष काढणं सोसायटीची नोंदणी करण्यासारखे झालंय, चव्हाणांचा राणेंना टोला

नैतिकता शिल्लक राहिली आहे का?

औरंगाबाद | Updated: October 5, 2017 6:43 PM

अलीकडच्या काळात अनेक नवीन पक्ष स्थापन होत आहेत. त्यामुळे नव्या पक्षाची निर्मिती म्हणजे एखाद्या सोसायटीची नोंदणी करण्यासारखी झाली आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. राजकारणात नैतिकता शिल्लक राहिली आहे का? या विषयावर औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनच्या पत्रकिरितेच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राणेंचे नाव न घेता त्यांनी राणेंवर टीका केली.

राजकीय पक्षाच्या संख्येवर मर्यादा असायला हवी. त्यासाठी ठराविक मते मिळवण्याची अट घालण्याची गरज आहे. जर एखाद्या पक्षाला ठरवून दिलेली मते मिळत नसतील तर नवा पक्ष काढण्यापेक्षा अपक्ष उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी, असेही ते म्हणाले. भारताची घटना ही सामाजिक परिस्थितीशी अनुकूल आहे. मात्र सध्या मंत्री होणं हे एकमेव ध्येय आहे. आज निवडून आलं की, पुढच्या राजकारणाची तयारी केली जाते. मात्र यावेळी प्रत्येकानं स्वतःला लक्ष्मण रेषा घालून दिली पाहिजे. कोणीही चांगला आणि वाईट नसतो, असे सांगत निवडणूक प्रचारात होणाऱ्या खर्चावर मर्यादा घालण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी सोनिया गांधी यांनी आग्रहाने माहितीचा अधिकार कायदा आणला. मंत्रिमंडळातील अनेक जणांनी या कायद्याला विरोध दर्शवला होता. विरोधाला झुगारुन कायदा संमत केल्याची किंमत आम्हाला निवडणुकीत मोजावी लागली, असेही ते म्हणाले. निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या मालमत्ता विवरण पत्रातील त्रुटीकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. उमेदवाराने निवडणुकीच्यावेळी दाखवलेले उत्पन्न आणि त्याचे राहणीमान यातून उत्पन्नाचे उत्पन्न चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे स्पष्ट होते.

राजकारणातील घराणेशाहीच्या मुद्यावर चव्हाण म्हणाले की, आई वडील राजकारणात होते. मात्र त्यांच्याकडून कधी राजकारणात येण्याचा आग्रह करण्यात आला नाही. परदेशातून शिक्षण पूर्ण करुन मायदेशी परतल्यानंतर राजीव गांधी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवली. राजकीय वारसा असल्यामुळे निवडूनही आलो. अन्यथा निवडून येणे शक्य झालं नसतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्याबाबत होत असलेले घराणेशाहीचे आरोप माझ्या बाबतीतही होतात.

 

 

First Published on October 5, 2017 6:10 pm

Web Title: new political party like registering a society prithviraj chavan to target narayan rane
 1. S
  shrikant
  Oct 5, 2017 at 11:20 pm
  वाः चव्हाणसाहेब तंतोतंत उपमा दिलीत ..राज ठाकरेंनी सुद्धा फुटबॉलची तुलना करून राणेंना वस्तुस्थिती दाखवली. राणे त्यांच्या वाचाळपणामुळे आणि विशेष शिस्तीच्या मुलांमुळे कोणालाच नको आहेत. भाजपने त्यातल्या त्यात वेगळा पक्ष काढायला लावून त्यांना हातभऱ दूर ठेवले आहे. आता डोक्यावर ईडीची तलवार ठेवून गळ्यात पट्टा बांधून त्यांना वापरून घेणार.
  Reply
  1. A
   Ashok
   Oct 5, 2017 at 10:43 pm
   भाजप ने काही गुंडांच्या कौटुंबिक टोळ्या विकत घेतल्या आहेत व जनतेची घोर फसवणूक आता उघड उघड चालू केली आहे त्या भारावलेल्या दिवसांची आता कुचेष्टा होऊ लागली आहे " भीक नको पण कुत्रे आवार " अशी जनतेची अवस्था झाली आहे. भाजप चे नाव बसलून "आवोजावो तुम्हारा घर " असे ठेवावे.किंवा सर्व सर्वपक्षीय भाजप. भाजप ने सर्व जनतेची घोर निराशा केली आहे तो आता टग्यांचा व गुंडांचा पक्ष झाला आहे. ज्यांच्या विरोधी प्रचार करून जनतेला फसवून मते मिळवली त्यांनाच आमच्या बोडक्यावर मंत्री म्हणून लादले जाणार असेल तर संधी मिळालेल्या भाजपला जनता हिसका पण तेवढ्याच ताकदीने नक्की देणार.आज जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.जनता वेगाने भाजप विरोधी होत आहे.
   Reply