नववर्ष २०१९ चे स्वागत जल्लोषात करण्यासाठी ३१डिसेंबर २०१८ते मंगळवारी १ जानेवारी २०१९ पर्यंत परमिटरुम उघडे राहणार असून वाईन शाॅपसाठी पहाटे १वाजेपर्यंत परवानगी दिल्याचे वरिष्ठ पोलिस सुत्रांनी सांगितले.
अतिउत्साही लोकांच्या बेफाम वृत्तीला लगाम लावण्यासाठी पोलिसआयुक्तालयाने जवळपास ३हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत.हर्सूल, जालनारोड, पैठणरोड, दौलताबाद टी पाॅईंट, वाळूजनाका या ठिकाणी फिक्स पाॅईंट लावण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६५ फिक्स पाॅईंट लावण्यात आले आहेत. बेकायदेशीर दारु विक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्यासाठी गुन्हेशाखेची वेगवेजळी पथके तयार झाली आहेत. तसेच काही अनुचित घटना घडल्यास पीसीआर आणि चार्ली पथके नेमण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2018 10:21 pm