मागणी आणि पुरवठय़ाची साखळी विस्कळीत; दरवाढीची शक्यता

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

निश्चलनीकरणानंतर राज्यातील मालवाहतुक ४० टक्क्य़ांनी घटली असून मागणी आणि पुरवठय़ाचे गणित येत्या काही दिवसांत पूर्णत: कोलमडेल, असा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयास पाठवला आहे. यामुळे अन्नधान्य महाग होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मराठवाडय़ातून होणाऱ्या मालवाहतुकीचा अहवाल नुकताच देण्यात आला असून उमरगा सीमावर्ती नाक्यावरून ४० टक्के, तर नांदेडमधून मालवाहतुकीमध्ये ३० टक्के घसरण झाली आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू शकतात किंवा माल आला नाही म्हणून व्यापारी मनमानीही करू शकतात. मराठवाडय़ातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० ते ३५ टक्के धान्याची आवक कमी झाली आहे. लातूरमध्ये १ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत २ लाख ७ हजार ८७९ क्विंटल (पान ८ वर)

अन्नधान्य पुरवठय़ावर परिणाम

महाराष्ट्रात ३० लाख मालमोटारी आहेत. पेट्रोकार्डसह जरी वाहनचालकाला पाठवायचे असले, तरी किमान ३० ते ४० हजार रुपये रोखीने वाहतूक ठेकेदार देतात. यामध्ये टोल, माल चढविणे आणि उतरविणे यासाठी बराच खर्च येतो. नोटा नसल्यामुळे मालवाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम अन्नधान्य पुरवठय़ावर होऊ शकतो.  नांदेड आणि उमरगा येथील सीमावर्ती नाक्यांवर वाहतुकीत घट झाल्याची आकडेवारी परिवहन आयुक्तांपर्यंत देण्यात आली आहे.