भारतीय जनता पार्टी म्हणजे नरेंद्र मोदी असे समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे सर्वत्र मोदी..मोदी.. मोदी असा गजर पाहायला मिळतो. मोदींची पक्षातील क्रेझ दिवसागणिक वाढत जात आहे. त्यामुळे पक्षाच्या झेंड्यावरही त्यांनी जागा मिळवली आहे. औरंगाबादमधील भाजपचे नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे यांच्या गाडीसमोर पक्षाचा झेंडा आहे. त्याच्या एका बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षाचे बोधचिन्ह ‘कमळ’. त्यामुळे मोदी हे भाजपचे जणूकाही बोधचिन्ह झाले आहेत.

औरंगाबादच्या सातारा-देवळाई परिसरातून भाजपच्या तिकिटावर आप्पासाहेब हिवाळे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. काळ्या रंगाची (एमएच २०, सी एक्स ७१७१) फॉरच्युनर गाडी ते महापालिकेत येण्यासाठी वापरतात. तिच्यावर महापालिका सदस्य असलेला बॅच लावलेला आहे. तिच्या समोरील बाजूस झेंडा लावला आहे. त्याच्यावर मोदींचा फोटो छापल्याचे दिसते. झेंड्यावरील मोदींच्या फोटोबद्दल नगरसेवक हिवाळे म्हणाले की,  मोदी हे लोकप्रिय व्यक्तिमत्व असून माझे  ते आवडते नेतृत्व असल्यामुळे त्यांचा फोटो झेंड्यावर छापला आहे.  दुसऱ्या बाजूने पक्षाचं बोधचिन्ह छापलेल आहे, असे देखील त्यांनी न विसरता सांगितले. अप्पासाहेब हिवाळे यांच्या गाडीचा नंबर ७१७१ असा आहे. या नंबरच्या गाडीचे ‘नाना’ असा फेन्सि नंबर त्यांनी या अगोदर तयार केला होता. त्याविरोधात तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई केली होती.

2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
violence in bengal before election
NIA च्या पथकावर हल्ला, पश्चिम बंगालमधील वातावरण तापले; वाचा याआधीच्या निवडणुकांमधील हिंसाचाराचा इतिहास
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
Police-Naxalite encounter on Chhattisgarh border plans of the Naxals to cause an accident were foiled
छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात…