News Flash

दगडाने ठेचून वृद्धाचा खून

जिल्ह्य़ातील चाकूर येथे दगडाने ठेचून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रल्हाद शांतविरअप्पा अक्कनवरू (७५) असे या वृद्धाचे नाव असून, मंगळवारी पहाटे हा

माथेफिरुने त्या तरुणीवर एक - दोन नव्हे तर तब्बल २१ वेळा चाकूने वार केले.

जिल्ह्य़ातील चाकूर येथे दगडाने ठेचून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रल्हाद शांतविरअप्पा अक्कनवरू (७५) असे या वृद्धाचे नाव असून, मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. चाकूर पोलिसांनी या प्रकरणी चार पथके तयार करून तपासमोहीम सुरू केली असली, तरी त्यास अजून यश आले नाही.
सोमवारी रात्री जेवण करून आपल्या ओम किराणा स्टोअर्स या दुकानासमोर अक्कनवरू झोपले होते. सकाळी नातू त्यांना उठवण्यास गेला, तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे जिल्ह्य़ात खळबळ उडाली. पुणे विभागाचे सीआयडी प्रमुख व नागपूर विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या प्रसाद अक्कनवरू हे त्यांचे चिरंजीव होत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 1:10 am

Web Title: older crushed stone murder
टॅग : Latur
Next Stories
1 पाणी पहाऱ्यात..
2 ‘मुंबईत दोन्ही पक्षांना क्षमतेची चाचपणी करण्याचा अधिकार’
3 शिवस्मारक कार्यालयाचे सोमवारी मुंबईत उद्घाटन
Just Now!
X