07 July 2020

News Flash

नांदेडमध्ये वीज कोसळून सालगड्याचा मृत्‍यू

मेघगर्जनेसह रिमझिम पावसाला सुरूवात

वीज कोसळून एका तरूण सालगड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातील सरसम शिवारात रविवार (दि.14) रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान घडली. सुभाष दिगांबर गुंडेकर (वय ४५) असे मयत सालगड्याचे नाव आहे. सालगडी सुभाष गुंडेकर हा शेतीकामं करण्यासाठी विजय देशमुख यांच्या शेतात गेला होता. रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह रिमझिम पावसाला सुरूवात झाली.

 

दरम्यान आश्रयासाठी जवळच्या बाभळीच्या झाडाखाली बैलगाडीजवळ थांबला असता कडाडून वीज कोसळली. यातच सालगड्याचा जागीच मृत्यू झाल. या घटनेमुळे सरसम परिसरात दुःखाची छाया पसरली आहे. मयताच्या पश्चात्य पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. मयताच्या कुटूंबास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 8:59 am

Web Title: one man dead in nanded sunday nck 90
Next Stories
1 करोनामुळे औरंगाबादमध्ये १३१ जणांचा मृत्यू
2 मराठवाडय़ातून पुणे वापसी!
3 औरंगाबादमधील भाऊ-बहीण दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; दोन नातेवाईकांना अटक
Just Now!
X