News Flash

हिंगोलीत ५२२ जणांचा अवयवदानाचा संकल्प

दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा होत आहेत

मृत्यू झाल्यानंतर शरीराचे अवयवदान करण्यासाठी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयाकडून जनजागृती अभियान राबवले जात असून, या अभियानाच्या जनजागृतीमुळे ५२२ जणांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.

दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा होत आहेत, त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होत असून अनेकांना जीवदान मिळत आहे. मृत व्यक्ती ज्याची हृदयक्रिया चालू आहे, ज्याचा मेंदू मृत आहे, अशा व्यक्तीच्या बहुतेक प्रमुख अवयवाचे म्हणजे मूत्रिपड, फुफ्फुस, यकृत, स्वादुिपड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे पडदेही दान करू शकता येतात, अशी माहिती डॉ. गोपाल कदम यांनी दिली.  ३० सप्टेंबरपासून राबवण्यात आलेल्या अवयवदान अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, गेल्या चार दिवसांत ५२२ दात्यांनी पुढाकार घेऊन अवयवदान करण्याचा संकल्प केला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

मृत्यूनंतर अवयव दान करावयाचे असल्यास अवयवदात्यांनी याबाबत संबंधितांच्या घरी कळवणे आवश्यक असते. अवयवदान सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे कुठल्याही धर्माची परवानगी त्यासाठी घ्यावी लागत नाही. जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभागाकडून महाअवयव दान दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली असल्याचे ते म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 1:33 am

Web Title: organ donation in hingoli district
Next Stories
1 पंचावन्न शाळांना ज्ञानररत्न आदर्श शिक्षणपुरस्कार
2 गुणवत्तेसाठी नांदेड जिल्हय़ात ८८ टक्के पालकांकडून टीव्ही बंद
3 हिंगोलीत ग्रामीण आरोग्य कर्मचारी महासंघाचे आंदोलन
Just Now!
X