कवि भूषण यांच्या साहित्याचाही अनुवाद करणार वेदकुमार वेदालंकार

मराठी भाषेतील महत्त्वाचे ग्रंथ आणि पुस्तके हिंदी भाषकांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या प्रा. वेदकुमार वेदालंकार यांनी पु. ल. देशपांडे यांच्या दहा हास्य-उपरोधिक लेखांचा अनुवाद नुकताच पूर्ण केला असून कानपूरच्या विकास प्रकाशनने ‘पु. ल. देशपांडे के हास्य-व्यंगात्मक लेख’ या नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. मराठीतील प्रमुख संतांच्या अभंगांचा पद्य अनुवाद, छावा, श्रीमान योगी, पाचोळा या मराठी कादंबऱ्यांसह महात्मा फुले यांच्या अखंडांसह त्यांचे सर्व साहित्य हिंदी भाषकांपर्यंत पोचविणाऱ्या वेदलंकारांना अनेक दिवसांपासून ‘पु. ल’ यांचे साहित्य हिंदी भाषकांपर्यंत न्यायचे होते. हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कवि भूषण यांच्या कवितांचा अनुवाद करण्याचेही ठरविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटनांवर ‘शिवभूषण’ हे पुस्तक प्रकाशित आहे, त्याचा अनुवाद वेदालंकार यांनी हाती घेतला आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

मराठी व हिंदी भाषेतील सुमारे ३० पुस्तकांचा अनुवाद वेदकुमार वेदालंकार यांनी पूर्ण केलेला आहे. संत तुकाराम, महत्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीचे अनुवाद वेदालंकार यांनी पूर्ण केले आहेत. मात्र, मराठी अस्मितेचा सच्चा लेखक हिंदी भाषकांना कळावा, यासाठी पुलंचे काही लेख त्यांनी अनुवादित केले. ‘चष्मा’, ‘चितळे मास्तर’, ‘काही अप-काही डाऊन’ यासह विविध हास्य व उपरोधिक लेखांचा समावेश या पुस्तकोत करण्यात आला आहे.

भाषा ‘अटकेपार’ नेण्याचा वेदकुमार वेदालंकार यांचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याने वेगवेगळे पुरस्कारही मिळाले आहेत. या अनुवादाबरोबरच कवी भूषण यांच्या साहित्य लेखनाचा अनुवादही लवकरच वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.