News Flash

लसीकरणाची गती संथच

सरसकट लस देण्याच्या मागणीला जोर

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना पुन्हा एकदा मार्गदर्शक सूचनांची जंत्रीच दिली जात असून प्रशासकीय पातळीवर खाटा वाढविण्याचा धोशा लावला जात आहे; पण करोनाविरोधाची लस आली असली तरी लसीकरणाचे युद्धातील हत्यार अद्याप पुरसे वापरलेच जात नसल्याची आकडेवारी दिसून येत आहे.

लस मात्रांची उपलब्धता, त्यासाठी लागणारा पैसा आणि लसीबाबत पहिल्या टप्प्यात निर्माण करण्यात आलेल्या अविश्वासी वातावरणामुळे औरंगाबाद जिल्ह््यातील ग्रामीण भागात तीन लाख ५५ हजार ९८९ व्यक्तींपैकी केवळ ३० हजार ४८८ जणांनी लसीकरण केले. शहरी भागात करोना रुग्णसंख्या वाढत असले तरी दोन लाख १७ हजार ५५० जणांचे लसीकरणाचे उद्दिष्ट असताना केवळ ६१ हजार ९९९ जणांनी लस घेतली आहे.

हे प्रमाण २८.५० टक्के आहे. दुसरी लाट थांबवून धरण्यासाठी अन्य उपाययोजनांबरोबरच लसीकरणाचा वेग वाढविल्यास त्याचा अधिक उपयोग होईल, त्यामुळे ज्या राज्यात करोना रुग्ण नाहीत त्या राज्यात लस देण्याऐवजी लसीच्या त्या कुप्या तातडीने दिल्या जाव्यात. प्रसंगी त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून किंवा राज्य आपत्ती निधीतून तरतूद करावी अशी मागणी होत आहे. करोना लढ्यात लसीकरणाचे हत्यार बाजूला ठेवून लढण्याऐवजी पल्स पोलिओ मोहिमेप्रमाणे करोना लसीकरण करावे अशी मागणी होत आहे.  वेतन वगळता करोना लढ्यातील अनेक बाबींवर खर्च करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने औरंगाबाद महापालिकेसाठी ५० ते ५२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. यात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या शिवभोजनापासून ते चाचण्या आणि डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या मानधनाची रकमेचाही समावेश होता.

औरंगाबाद शहरातील सोळा लाख लोकसंख्येतील १८ वर्षे वयोगटापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती वगळून साधारणत: दहा लाख लोकसंख्येला लसीकरण केल्यास करोनाविरोधातील प्रतिपिंड निर्माण करणारी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. त्यामुळे सरसकट लसीकरणास परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

या लोकसंख्येसाठी प्रति व्यक्ती लागणारी २५० रुपये लसींची किंमत धरल्यास जेवढी रक्कम गेल्या वर्षभरात करोना रोखण्यासाठी लागलेल्या ५० टक्केच रक्कम लागू शकते. लागणारी रक्कम आणि लसीकरणाच्या कुप्या याचे गणित जुळवून येत्या दोन महिन्यांत त्यावर मात करण्यासाठी लसीकरण हेच प्रमुख हत्यार बनावावे अशी मांडणी सनदी अधिकाऱ्यांतून होऊ लागली आहे.

अशी आहे औरंगाबाद शहरातील लसीकरणाची आकडेवारी कंसातील आकडे शेकडा प्रमाण दर्शविणारे

उद्दिष्ट  करोना लढ्यातील    आरोग्य कर्मचारी सहव्याधीसह ४५ ते  ६०  वर्षे वयापेक्षा

आघाडीवरील संख्या      ५९ वयोगटातील व्यक्ती  अधिक व्यक्ती

२१६६५६ ९१४२ (६०.५२)   १९७५७ ( ७६.०१) ७०६५ (२४.१४)   २०४०८(१३.९४)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 12:15 am

Web Title: pace of vaccination is slow abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 प्रक्रियेनंतरच्या कचऱ्याचे डोंगर;  विल्हेवाटीचा प्रश्न
2 गुटखा वाईटच, पण तंबाखू अन्नपदार्थ कसा?
3 गुटखा माफियांवर कारवाईनंतर जामिनाला पोलीस विभागाकडून बळ!
Just Now!
X