दिवा अंगावर पडून भाजलेल्या 14 वर्षांच्या मुलीचा 23 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मी रामदास नंदगुडे (१४) असे या मुलीचे नाव आहे.

लक्ष्मी रामदास नंदगुडे ही पैठणमधील लक्ष्मीनगर येथे राहत होती. २३ डिसेंबररोजी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी कर दिन होता. या दिवशी मारुतीला तेल वाहून नारळ फोडले जातात. नारळ फोडल्यानंतर देवासमोर दिवा लावला जातो. लक्ष्मी देखील घरात दिवा लावत असताना पेटता दिवा तिच्या अंगावर पडून ती भाजली. तिला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आणल्यानंतर तीन आठवड्यांनी तिचा मृत्यू झाला पुढील तपास पोलिस निरीक्षक इमले करत आहेत.