News Flash

प्रचारसभेत पंकजा मुंडेंचे व्यासपीठ कोलमडले!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा प्रवेश या प्रचारसभेत सुरू होता.

प्रचारसभेत पंकजा मुंडेंचे व्यासपीठ कोलमडले!

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे जि. प. निवडणुकीच्या प्रचारासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठाच्या फळ्या बसल्याने मंच कोलमडला. केवळ १५ ते २० जण व्यासपीठावर बसतील, अशी व्यवस्था असतानाही ५० ते ६० जण व्यासपीठावर चढल्याने ते कोलमडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा प्रवेश या प्रचारसभेत सुरू होता. सायंकाळी सहाच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे पंकजा मुंडे यांना काहीशा गोंधळातच भाषण करावे लागले.

वैजापूर तालुक्यातील महालगावातून शिवसेनेच्या उमेदवारांना अधिक बळ मिळते, असा अनुभव आहे. म्हणून या गावात विशेष सभा घेण्याचे ठरविण्यात आले होते. महालगाव येथे यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी अधिक गर्दी केल्यामुळे मंच कोलमडला. त्यानंतर मी कमकुवत नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 1:02 am

Web Title: pankaja munde 5
Next Stories
1 निजामकालीन सर्व दस्तऐवज हैदराबादकडून मागवणार
2 पोलिसांच्या ताब्यातील संशयिताचा मृत्यू
3 बँक ऑफ महाराष्ट्रच्या बंद खात्यातून ३३ लाख काढले!
Just Now!
X