News Flash

राष्ट्रवादीचे नेते लाल दिवा टिकवण्यासाठी निवडणूक रिंगणात – पंकजा मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहर विकासाच्या गप्पा मारत जनतेला भुलवून गुत्तेदारांना पोसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहर विकासाच्या गप्पा मारत जनतेला भुलवून गुत्तेदारांना पोसत आहेत. अशांच्या हाती सत्ता देणार का, असा थेट प्रश्न करून भ्रष्ट प्रवृत्तीला रोखण्यासाठी आणि शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी भाजप-सेना युतीला मत द्या. राष्ट्रवादीचे नेते लाल दिवा टिकवण्यासाठी निवडणुकीत उतरले आहेत, असा घणाघाती हल्ला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर पालिका निवडणूक मदानात चढवला आहे.  परळी नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सुरेखा मेनकुदळे यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपासून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शहरातील पद्मावती, नेहरू चौक, वडारवाडा या भागात प्रचारसभा घेत पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. पंकजा मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेची अवस्था सर्वत्र अस्वच्छ शहर आणि अर्धवट कामे अशी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते शहराचा आदर्श विकास केल्याचा कांगावा करत आहेत. पण विकास कोठेच दिसत नाही. मात्र त्यांच्या नगरसेवकांचे मजले वाढले आहेत. गटारे उघडी आणि विकास भूमिगत झाला असून या वेळी त्यांना मत दिल्यास शहरही भूमिगत होईल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 1:02 am

Web Title: pankaja munde comment on ncp 2
Next Stories
1 अंबाजोगाईत काँग्रेस उमेदवाराला पैसे वाटताना प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पकडले
2 चमत्कार घडलाच नाही !
3 निश्चलनीकरणानंतर मालवाहतूक ४० टक्क्यांनी घटली
Just Now!
X