श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ पुण्यतिथी कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री राम िशदे, राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. भगवानगडावर राजकीय भाषणबाजी बंदीच्या वादंगाच्या पाश्र्वभूमीवर गहिनीनाथगडावर राजकीय पुढारी काय बोलतात? याकडे सर्वाचे लक्ष लागल्याने भाविकांची गर्दी होणार आहे.
जिल्ह्यात धार्मिक गडांवरून राजकीय भाषणबाजीची परंपरा वर्षांनुवष्रे चालत आली आहे. श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी काही महिन्यांपूर्वी गडावरून यापुढे राजकीय भाषणबाजीला बंदी करण्याची घोषणा केल्यानंतर मोठय़ा प्रमाणात वादंग उठले. मात्र, महंतशास्त्रींच्या भूमिकेवर ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्यासह कोणत्याही नेत्याने जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र, सार्वजनिक माध्यमातून महाराजांच्या भूमिकेवर टीकाटिप्पणी झाली. या पाश्र्वभूमीवर पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम उद्या (सोमवारी) होत आहे. परंपरेनुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी पूजा होणार आहे, तर दुपारी कीर्तनानंतर मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री िशदे, राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर हे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. भगवानगडावरील राजकीय भाषणबाजी बंदीच्या पाश्र्वभूमीवर या कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलतात? याकडे लक्ष लागले आहे.