दुष्काळी स्थितीत खरिपाचे पीक गेल्याने आíथक अडचणीत सापडलेल्या अल्पभूधारक १ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून रविवारी (दि. ११) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपये मदतीचे वाटप होणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन होत असले, तरी या कार्यक्रमातून शिवसेनेला पूर्णपणे डावलले जात असल्याने नाराज उद्धव ठाकरे यांनी बीडला येऊन शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका घेतल्याने सत्ताधारी युतीअंतर्गत वातावरण गरम झाले आहे.
जिल्ह्यात यंदाही पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने खरिपाची पेरणी पूर्ण वाया गेली. परिणामी रब्बीच्या हंगामातही शेतकरी अडचणीत आल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढले. या पाश्र्वभूमीवर सरकारसह विविध संस्थांकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा आधार दिला जात आहे. आता शिवसेनेने खरिपाचे पीक गेलेल्या आणि आíथक अडचणीत आलेल्या जवळपास १ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये या प्रमाणे १ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील गावागावांत जाऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांची निवड केली. शहरातील रामकृष्ण मंगल कार्यालयात मदतीचे वाटप होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल जगताप व बाळासाहेब िपगळे यांनी दिली. पर्यावरणमंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत.