News Flash

पोलीस अधिकाऱ्याकडून पत्नीचा छळ

या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक मनसूर शाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीनेच २ लाख रुपयांसाठी छळ व मारहाण केल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलीस मुख्यालयात नियुक्त सहायक पोलीस उपनिरीक्षक मनसूर शाह इसा शाह (वय ५६) विरुद्ध पत्नीनेच २ लाख रुपयांसाठी छळ व मारहाण केल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून मनसूर शाहविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिन्सी ठाण्यात समिना मनसूर शाह (वय ३०, रा. खासगेट, बायजीपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, की २१ जून २००९ रोजी लग्न झालेल्या दिवसापासून सहायक पोलीस निरीक्षक मनसूर शाह यांनी नूर कॉलनीतील पोस्ट ऑफिसजवळील राहत्या घरात माहेराहून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून वारंवार छळ केला, मारहाण केली, मानसिक त्रास दिला.

या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक मनसूर शाह यांच्याविरुद्ध गुन्हा  दाखल  करण्यात  आला आहे. दरम्यान, शहरात ६ मे रोजी महिलांच्या विनयभंगाच्या चार घटना घडल्या. मुकुंदवाडीत २ तर वाळूज व सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक घटना नोंद आहेत.या प्रकरणी दत्ता रामभाऊ जाधव, विलास गावंडे, कृष्णा ससाणे, रामेश्वर ससाणे, जितेंद्र काकडे व अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 2:01 am

Web Title: police officer tortured wife in aurangabad
Next Stories
1 तपोवन एक्सप्रेसमधून अपहरण झालेल्या चिमुकलीची सुखरुप सुटका
2 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना राबवणार विशेष मोहीम
3 देशाला ‘हिंदूराष्ट्र’ बनवण्यासाठी मोहन भागवतांनी राष्ट्रपती व्हावं : उद्धव ठाकरे
Just Now!
X