News Flash

घरांच्या किमतीत १० टक्क्य़ांपर्यंत वाढ शक्य

नोटाबंदीने सर्वात मोठा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. व्यवसायात ४० ते ५० टक्के घट झाली आहे.

घरांच्या किमतीत १० टक्क्य़ांपर्यंत वाढ शक्य

क्रेडाईच्या राज्य कार्यकारिणीतील सूर

नोटाबंदीने सर्वात मोठा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. व्यवसायात ४० ते ५० टक्के घट झाली आहे. त्यात नवा रेग्युलेटरी कायदा लागू करण्यात आल्यानंतर अनेक मर्यादा येणार असल्या, तरी काही अपप्रवृत्तींना आळा बसणार आहे. मात्र नवीन कायद्यात असलेल्या काही त्रुटी असून त्या दूर कराव्यात, अशी मागणी करून घरांसह बांधकाम व्यवसायातील काही कामाच्या किमतीत ८ ते १० टक्क्य़ांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज क्रेडाईचे राज्य अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी व्यक्त केले.

क्रेडाई कार्यकारिणीची बैठक शनिवारी येथे पार पडली. या बैठकीस राज्य व देशभरातून आलेले सुमारे २२०० सदस्य उपस्थित होते. या वेळी सरोदे बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर, शहर शाखेचे अध्यक्ष सुनील पाटील, आदित्य जावडेकर, अनुज भंडारी, राजेंद्रसिंग जबिंदा, शांतीलाल कटारिया, प्रमोद खैरनार, महेश साधवानी, दर्शन परमार आदींची उपस्थिती होती.

प्रशांत सरोदे म्हणाले, नोटाबंदीनंतर घरांच्या किमती कमी होतील, असा समज पसरला होता. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. बँकांनी कर्जावरील व्याजदरामध्ये कपात केली आहे. घराच्या मासिक हप्त्यामध्ये फरक पडल्यामुळे ग्राहक पुन्हा वास्तू खरेदीचा विचार करीत आहे. भविष्यात घरांच्या किमतीमध्ये ८ ते १० टक्क्य़ांनी वाढ झालेली असेल. नव्या कायद्यानुसार प्रत्येक व्यावसायिकाला वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट नेमणे बंधनकारक असणार आहे. या प्रसंगी बोलताना राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर यांनी मे महिन्यापासून अमलात येणाऱ्या नव्या रेरा (रिअल इस्टेट रेग्युलटेरी अ‍ॅक्ट) या कायद्याविषयीची माहिती दिली. या कायद्यामुळे काही अपप्रवृत्तींनी आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करून मगर यांनी काही त्रुटींकडेही बोट दाखवले. पर्यावरण, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेक गृहप्रकल्प वर्षांनुवर्षे रखडल्यानंतर त्याचे नुकसान बांधकाम व्यावसायिकाला बसते. परिणामी ग्राहकांना वेळेवर घर देता येत नाही. त्यामुळे बांधकामाच्या परवानगीसाठी वेळेची मर्यादा नव्या कायद्यात स्पष्ट करावी. नोटाबंदीनंतर आता हळूहळू बांधकाम व्यवसाय स्थिरस्थावर होऊ लागला आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत क्रेडाईच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2017 12:21 am

Web Title: price of housing would increases by 10 percent
Next Stories
1 नांदेड रेल्वे विभागात समस्या अधिक
2 प्रचारसभेत पंकजा मुंडेंचे व्यासपीठ कोलमडले!
3 निजामकालीन सर्व दस्तऐवज हैदराबादकडून मागवणार
Just Now!
X