प्रधानमंत्री पीकविमा योजनेत चालू खरीप हंगामासाठी पीकविम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुल आहे. पीकविमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून, बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून, योजनेचा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी विमाहप्ता भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवला आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे, ते पीक शेतात पेरल्याबद्दलचा तलाठय़ाचा पीक पेऱ्याचा दाखला, सात-बारा व आठ अ उताऱ्यासह नजीकच्या बँकेत विमा हप्ता चलनाद्वारे भरावा लागेल. पीकविमा योजनेत जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी केले. संरक्षित रकमेवर दिलेल्या पीकविमा दराप्रमाणे विमा हप्ता भरावयाचा आहे.

तांदूळ पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३९ हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता ७८० रुपये, खरीप ज्वारीसाठी संरक्षित रक्कम हेक्टरी २४ हजार आणि पीकविमा हप्ता ४८० रुपये, बाजरी पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी २० हजार आणि पीकविमा हप्ता ४०० रुपये, तूर पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी २८ हजार आणि पीकविमा हप्ता ५६०, उडीद पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी १८ हजार आणि पीकविमा हप्ता ३६०, मूग पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी १८ हजार आणि पीकविमा हप्ता ३६०, कारळे पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी २० हजार आणि पीकविमा हप्ता ४०० रुपये, भुईमूग पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी ३० हजार आणि पीकविमा हप्ता ६०० रुपये, तीळ पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी २२ हजार आणि पीकविमा हप्ता ४४० रुपये, सोयाबीन पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी ३६ हजार आणि पीकविमा हप्ता ७२० रुपये, सूर्यफूल पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी २४ हजार आणि पीकविमा हप्ता ४४० रुपये, मका पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी २५ हजार आणि पीकविमा हप्ता ५०० रुपये, तर कापूस पिकासाठी संरक्षित रक्कम हेक्टरी ३६ हजार आणि पीकविमा हप्ता १ हजार ८०० रुपये असा हप्ता राहील.

जिल्हा बँकेमार्फत ४१९.७२ कोटी पीकविम्याचे वाटप

जिल्हा सहकारी बँकेमार्फत करावयाच्या ४५५ कोटी रुपयांच्या पीकविम्याचे वाटप अजून पूर्ण झाले नाही. पकी आतापर्यंत ४१९.७२ कोटींचा पीकविमा वाटप करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली. या बरोबरच राज्यात सर्वाधिक पीकविम्याचे वाटप उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेमार्फत केल्याचा दावाही त्यांनी केला. पीकविम्यापोटी प्राप्त झालेल्या ४५५ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्यानंतर खात्यावर जमा झालेल्या एकूण रकमेपकी ४१९.७२ कोटी शेतकऱ्यांना वाटप केले असल्याचे अध्यक्ष बिराजदार यांनी सांगितले.