काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी (दि. १२) व शुक्रवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत. अंबाजोगाई येथे दुष्काळ निवारण परिषदेस उपस्थित राहून जनावरांच्या छावण्यांसह लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांना ते भेट देणार आहेत. जिल्हाभरातील कार्यकत्रे, शेतकऱ्यांशी संवाद साधून एकूण स्थितीचा अहवाल ते सरकारला देणार आहेत.
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राजकिशोर मोदी यांनी मागील चार दिवसांपासून तालुकास्तरावर जनसंवाद सुरू केला. मंगळवारी गेवराई, बीड येथे कार्यकर्त्यांच्या बठका घेतल्यानंतर मोदी यांनी पत्रकारांना माहिती दिली. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन काँग्रेसच्या वतीने तालुका पातळीवर जाऊन कार्यकत्रे, शेतकरी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण जनसंवाद सुरू केला. ग्रामीण भागात पाण्याचे टँकर वेळेवर पोहोचत नाहीत. दैनंदिन खेपाही कमी केल्या जात आहेत, असे निदर्शनास आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत माजी मंत्री अमित देशमुख, खासदार रजनी पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. आष्टी तालुक्यातील कडा येथील डाळिंब बागायतदारांना भेटून दासखेड, खापरपांगरी येथील गुरांच्या छावणीला भेट, केज तालुक्यात धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील गाळ उपसण्याच्या कामाची पाहणी, सायंकाळी अंबाजोगाईत दुष्काळ निवारण परिषदेस उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी अंबाजोगाई व केज तालुक्यांत लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी, धारूर, माजलगाव, गेवराई तालुक्यांना भेटी देणार आहेत. माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सर्जेराव काळे, राजेश देशमुख, अशोक िहगे आदी उपस्थित होते.