19 November 2019

News Flash

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्यास अटक

कापूस वेचणीसाठी शेतात जाणाऱ्या महिलेस रस्त्यात अडवून मारहाण करीत अत्याचार केल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील हिवरगव्हाण येथे घडला.

कापूस वेचणीसाठी शेतात जाणाऱ्या महिलेस रस्त्यात अडवून मारहाण करीत अत्याचार केल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील हिवरगव्हाण येथे घडला. या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी शहरात बंद पाळून निषेध रॅली काढण्यात आली, तर माजलगाव शहरात पित्यानेच स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली.
जिल्ह्यातील हिवरगव्हाण (तालुका वडवणी) येथील ३२ वर्षीय महिला शेतात जात असताना रस्त्यात अडवून उसात नेऊन अत्याचार करण्यात आला. मारहाणीमुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला बेशुद्ध अवस्थेत ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधिकाऱ्यांनी पीडित महिलेचा इनकॅमेरा जबाब नोंदवून दोन संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल असून रविवारी वडवणीत सर्वपक्षीय बंद ठेवून निषेध रॅली काढण्यात आली. आरोपींना तत्काळ अटक करून खटला जलदगती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
माजलगाव शहरातील गजानन भागात मालमोटारचालक असलेल्या ४२ वर्षीय पित्याने स्वत:च्या १७ वर्षीय मुलीचा शारीरिक छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने पित्याकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती आईला सांगूनही कोणतीच दखल न घेतल्याने रविवारी तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार तिच्या पित्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी पीडित मुलीचा इनकॅमेरा जवाब घेऊन पित्यास अटक केली.

First Published on November 9, 2015 1:10 am

Web Title: rape on miner girl father arrest
Just Now!
X