21 August 2019

News Flash

काँग्रेस कार्यकर्त्यांचा परभणीत रास्तारोको

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील पटियाला न्यायालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हजर व्हावे लागल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने शनिवारी परभणीत रास्ता

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील पटियाला न्यायालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हजर व्हावे लागल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने शनिवारी परभणीत रास्ता रोको केला. रास्तारोको करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची अटक व सुटका झाली.
देशात गाजत असलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  शनिवारी दिल्लीतील पटियाला न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. ही कारवाई केंद्र शासन सूडबुद्धीने आणि जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप करुन याच्या निषेधार्थ परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीने दुपारी एक वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलन केले.  तासभर चाललेल्या आंदोलनामुळे वसमत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर भगवान वाघमारे, प्रदेश सचिव बाळासाहेब देशमुख, नागेश सोनपसारे, सत्तार इनामदार, रवी सोनकांबळे, सुनिल देशमुख, शाम खोबे, खदीरलाला हाश्मी, बाळासाहेब दुधगावकर, इरफान मलीक, मलेका गफार,अभय देशमुख,  जानुबी, रत्नमाला सिंगनकर, आदी सहभागी झाले होते. नवा मोंढा पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अटक केली. काही वेळाने अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटकाही झाली.

First Published on December 20, 2015 1:30 am

Web Title: rasta roko of congress in issue of national herald in parbhani