16 October 2019

News Flash

तरुणाचा खून; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

पोलिसांनी रविशंकर तायडे, आदिनाथ ऊर्फ चिकू चव्हाण यांना अटक केली आहे.

औरंगाबाद : मद्यपींच्या टोळक्याकडून तरुणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला. सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना पुंडलिकनगर भागात घडली. घटना घडली त्याच भागात प्रचारसभा सुरू होती आणि त्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, मंगळवारी खून झालेला तरुण दत्तात्रय गंगाराम शेळके (वय २८) याच्या सर्व मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईक व पुंडलिकनगर भागातील नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. या वेळी दहा ते बारा पोलिसांच्या समक्ष ही घटना घडली, असा आरोप मृताच्या भावाने केला आहे. पोलिसांनी रविशंकर तायडे, आदिनाथ ऊर्फ चिकू चव्हाण यांना अटक केली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी शिर्डीतून सोमेश रिडलॉन व श्याम भोजय्या या दोघांना ताब्यात घेतले असून अन्य दोघेही रात्रीपर्यंत मिळतील, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.

First Published on April 17, 2019 1:15 am

Web Title: relative refuse to take dead body possession until arresting all the killers