31 October 2020

News Flash

गरिबांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन कमी किमतीमध्ये

दोन सुविधा केंद्रांवर २ हजार ३६० रुपयांना एक कुपी

रेमडेसिवीर (संग्रहित छायाचित्र)

दोन सुविधा केंद्रांवर २ हजार ३६० रुपयांना एक कुपी

औरंगाबाद : शहरातील गरीब करोना रुग्णांच्या नातेवाइकांना दोन ठिकाणी २ हजार ३६० रुपयांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय अन्न आणि औषधी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रात तसेच हडको येथील अर्बन बाजार येथे शल्य चिकित्सकांनी शिफारस केलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना हे इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती औषधी विभागाचे सहसंचालक संजय काळे यांनी सांगितले. आता या इंजेक्शनसह करोनासाठी म्हणून वापरात असणाऱ्या कोणत्याही औषधाचा तुडवडा नसल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारपासून करोना रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी वाढ  दिसून येत आहे. शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात २५७ जणांना नव्याने संसर्ग झाला. तर रविवारी सकाळच्या सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात चार जणांचा मृत्यू झाला.

शहरातील विविध रुग्णालयांतून करोना संसर्गमुक्तीचे प्रमाण वाढले असून घाटी रुग्णालयात आतापर्यंत ८०५ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद शहरातील करोना प्रसार आणि मृत्यूचे प्रमाणही नियंत्रणात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या जरी वाढलेली दिसत असली, तरी एकाच गावात अधिक नाही. त्यामुळे उपचारावर तसा ताण नसल्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात येत आहे. औषधे आणि ऑक्सिजन दोन्ही पुरेसे उपलब्ध असल्याने करोना हाताळणीतील प्रशासनाचा आत्मविश्वासही वधारला आहे. गेल्या काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. आता इंजेक्शनची उपलब्धता आणि त्याची किंमतही कमी करण्यात आली असून गरिबांसाठी कमी किमतीमध्ये इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:02 am

Web Title: remdesivir injection for the poor at low cost zws 70
Next Stories
1 खेळाडूंसाठी आजपासून मैदाने खुली
2 करोनामुक्तीचे प्रमाण ९० टक्क्यांवर; हिंगोलीनंतर औरंगाबादची आघाडी
3 शिलाई यंत्राच्या बाजारपेठेचे चाक गतिमान
Just Now!
X