News Flash

भाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध

माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

भाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध
माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला. खासदार-आमदारांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणी संतप्त भावना व्यक्त केल्या. या प्रकारामुळे लातूरची राज्यभरात बदनामी झाली आहे. लातूर सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. शहराला शैक्षणिक परंपरा आहे. ही परंपरा धोक्यात आणण्याचे काम शिवसनिकांनी केले, अशा भावना विविध मंडळींनी व्यक्त केल्या.
खासदार सुनील गायकवाड यांनी हा प्रकार दुर्दैवी असून दोषींवर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करावी. यासंबंधी आपण त्यांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रकरणी गंभीर दखल घेण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरच्या परंपरेला गालबोट लावणारी ही घटना असल्याचे सांगितले. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात अशी घटना घडणे ही दुर्दैवी बाब आहे. लातूर पॅटर्न व लातूरला शोभणारी ही घटना नक्कीच नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य चालते याची जाणीव न ठेवता हे अघोरी कृत्य घडले असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी लातूरची संस्कृती गुंडगिरीची वा दहशतीची नाही. या घटनेमुळे लातूरला गालबोट लागले असून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासंबंधी काळजी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी कायद्याची लढाई कायद्यानेच लढली पाहिजे. कायदा हातात घेऊन शिवसनिकांनी केलेली कृती ही निषेधार्ह असून या कृतीचा प्रत्येक जण निषेधच करेल, अशी भावना व्यक्त केली.
नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी लातूरचे नाव राज्यभर नेण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली. या प्रकारामुळे लातूरला खाली मान घालण्याची वेळ आली आहे, याबद्दल सर्वानीच चिंता केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे यांनी शिवसनिकांच्या मारहाणीचे कोणीही समर्थन करणार नाही. या घटनेची जितकी िनदा करावी तितकी कमी असल्याचे सांगितले. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना असून लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात घडलेला प्रकार चिंता निर्माण करणारा आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत, याबद्दल शिक्षणमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. शेकापचे ज्येष्ठ कार्यकत्रे उदय गवारे यांनी लातुरात सुरू झालेली गुंडगिरी निषेधार्ह असून शेतकरी कामगार पक्ष याचा तीव्र निषेध करीत असल्याचे सांगितले. भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस गुरुनाथ मगे यांनी लोकशाहीचा खून करणारी ही घटना असून या प्रवृत्तीचा भाजप कडाडून निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया दिली.
रिलायन्स पॅटर्नचे प्रमुख उमाकांत हानराव यांनी मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असून, शैक्षणिक क्षेत्रात समाज घडवण्याचे काम अपेक्षित आहे, बिघडवण्याचे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेचे अॅड. बळवंत जाधव यांनी भाईकट्टी यांच्या मारहाणीचे समर्थन आपण करणार नाही. मात्र, त्यांच्या कामाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी ही घटना लातूरच्या परंपरेला काळे फासणाऱ्या या प्रकाराची माहिती आपण थेट मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2015 1:10 am

Web Title: remonstrate of mallikarjun bhaikatti beating
टॅग : Beating
Next Stories
1 पाणीप्रश्नाच्या चक्रात लातूरकरांची घुसमट
2 तुळजापुरात उलाढाल मंदावली
3 शंभर पटींनी वाढवा साठे!
Just Now!
X