News Flash

जलसंपदाचे सल्लागार मेंढेगिरी यांचा राजीनामा

जलसंपदा विभागातील साफसफाई करताना या विभागाचा कारभार सुधारावा, या साठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार हि. ता. मेंढेगिरी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.

जलसंपदा विभागातील साफसफाई करताना या विभागाचा कारभार सुधारावा, या साठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार हि. ता. मेंढेगिरी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यांचा दर्जा काय, हे ना सरकारने ठरविले ना त्यांना सुविधा दिल्या. त्यांनी सुधारणांच्या अनुषंगाने दिलेल्या सल्ल्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे कानाडोळा केला. त्यामुळे वैतागलेल्या मेंढेगिरी यांनी पदाचा राजीनामा दिला. अजून तो स्वीकारला गेला नाही. मात्र, नि:स्पृह आणि पारदर्शक काम करणाऱ्या अधिकाऱ्याची सरकारने कोंडी केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
मेंढेगिरी यांची नि:स्पृह अधिकारी अशी जलसंपदा विभागात ओळख आहे. अनेक वादग्रस्त प्रकरणांची चौकशी मेंढेगिरी यांनी यापूर्वी केली आहे. आघाडी सरकारच्या काळात तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यास महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेतून वगळले जात होते. औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक असणाऱ्या मेंढेगिरी यांनी जलसंपदा सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर या विभागाचा कारभार सुधारण्यासाठी सल्लागार म्हणून मदत करावी, या उद्देशाने त्यांची जलसंपदा सल्लागार या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे बदनाम जलसंपदाला काही शिस्त लागेल, असे मानले जात होते. मात्र, नियुक्तीनंतर त्यांनी बसावे कोठे, हे सुद्धा सरकारने ठरविले नाही. जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते विभागात नको आहेत, असे संदेश दिले. या सर्व बाबींचा उल्लेख करून मेंढेगिरी यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिली.
मेंढेगिरी यांनी राजीनाम्याच्या वृत्तास दुजोरा दिला. मात्र, कोणत्या कारणाने हे पाऊल उचलले, हे सांगण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 1:20 am

Web Title: resigned of irrigation adviser h t mendhegiri
टॅग : Resigned
Next Stories
1 चौघांवर केवळ शिस्तभंग कारवाई; दोघा बडय़ांना वाचविण्याची कसरत!
2 कोल्हापूरच्या कैद्याची औरंगाबादेत आत्महत्या
3 ‘रेणू’च्या तीनपैकी २ बछडय़ांचा मृत्यू
Just Now!
X