News Flash

‘बौद्ध धर्म लोकशाहीला सुसंगत आणि पूरक’- प्रा. सदानंद मोरे

बौद्ध धर्म हाच लोकशाहीला सुसंगत आणि पूरक असल्याचे त्यांना आढळले, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक प्रा. सदानंद मोरे यांनी केले.

िहदू समाजाने अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गाचे दु:ख समजून घेतले नाही. त्यामुळे निराश झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातराची घोषणा केली. अभ्यासांती बौद्ध धर्म हाच लोकशाहीला सुसंगत आणि पूरक असल्याचे त्यांना आढळले, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक प्रा. सदानंद मोरे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उदारकला (लिबरल आर्ट्स) विभाग आणि अमेरिकेतील महाराष्ट्र स्टडीज ग्रुपतर्फे ‘महाराष्ट्र : समाज आणि समाज’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला शुक्रवारी सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोरे बोलत होते. अध्यक्ष म्हणून सिडनी विद्यापीठाचे प्रा. जिम मेसेलोस, उदारकला विभागाचे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन यांची उपस्थिती होती. आपल्या बीजभाषणात डॉ. मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समकालीन संदर्भ देत त्यांच्या धर्मातरापर्यंतचा प्रवास उलगडला. १९३६ मध्ये येवला येथे बाबासाहेबांनी धर्मातराची घोषणा केल्यानंतर १९५६ पर्यंत िहदू समाजाने किंवा िहदूंच्या तत्कालीन पुढाऱ्यांनी त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही, असे ते म्हणाले.
जिम मेसेलोस यांनी अध्यक्षीय भाषणात परिषदेमागची भूमिका विशद केली. महाराष्ट्रातील समृद्ध वारशाचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. डॉ. धारूरकर यांनी संतवाङ्मयाचे दाखले देऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची तोंडओळख करून दिली. समन्वयक डॉ. बीना सेंगर यांनी सूत्रसंचालन केले.
विविध विषयावर आज परिसंवाद
परिषदेत उद्या सकाळच्या सत्रात ‘स्पेसिस ऑफ भक्ती अॅण्ड सोल्सस’, ‘मोनिटायझेशन अॅण्ड अर्बन स्पेसिस अॅण्ड प्लेसेस ऑफ महाराष्ट्र’, ‘महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे व ऐतिहासिक वारसा’, ‘भाषिक राजकीय-सामाजिक चळवळी’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. समारोपप्रसंगी ज्येष्ठ सिने-नाटय़ कलावंत डॉ. मोहन आगाशे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवारी सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 1:56 am

Web Title: sadanand more assertion
Next Stories
1 वृद्ध महिलेचा गळा चिरून खून
2 दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व
3 ‘देशभक्त नथुराम गोडसे’ चित्रपटावर बंदी आणू नये – लोकशाहीवादी वकिलांचा न्यायालयात हस्तक्षेप अर्ज
Just Now!
X