महाराष्ट्राच्या रंगभूमीवर अत्यंत गाजलेल्या ‘सही रे सही’ या नाटकाचे सन्मानचषक औरंगाबादेतील रोशनगेट परिसरात भरणाऱ्या जुन्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे या सन्मानपदकावर महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत कलाकार, दिग्गज नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रोशनगेट परिसरात सोमवार ते बुधवार जुन्या वस्तूंचा बाजार भरतो. लहान खिळे, घडय़ाळ्यांपासून ते इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आदी वस्तू या बाजारात मिळतात . सध्या येथे मराठी माणसाचे लक्ष वेधून घेणारी एक वस्तू म्हणजे ‘सही रे सही’ या नाटकाचे सन्मानचषक. प्रख्यात अभिनेते भरत जाधव अभिनित हे नाटक अत्यंत गाजले होते. या नाटकाचे सन्मानचषक जुन्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या चषकावर  बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, आशा भोसले, अशोक पत्की, डॉ. श्रीराम लागू, डॉ. रघुनाथ माशेलकर, विजय तेंडुलकर, मनोहर जोशी, सचिन तेंडुलकर आणि सुलोचना यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

औरंगाबाद येथील रोशनगेट परिसरातील जुन्या बाजारात गाजलेले नाटक ‘सही रे सही’चे सन्मानचषक विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.