‘सिप’ अकॅडमी तर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘सुपरकीड’ हा पुरस्कार वर्ष २०२० चा समृद्धी सुजितकुमार गायकवाड हिला देण्यात आला. शालेय गुणवत्ते बरोबरच कला, क्रीडा आणि अबॅकस विषयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार ‘सिप’ अकॅडमी तर्फे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येतो. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समृद्धी गायकवाड ही केंब्रिज स्कूल ची इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी आहे. शालेय शिक्षणातील उत्कृष्ट कामगिरी बरोबरच ती कराटे मधील ‘ब्लॅक बेल्ट’ विजेती आहे. तिने कराटे आणि बॉक्सिंगच्या दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक पटकावले आहेत. राज्य पातळीवरील अनेक स्पर्धांमधून तिने पदके मिळविली आहेत. तसेच ती एक उत्कृष्ट स्क्वेश खेळाडू सुद्धाआहे.अबॅकसमध्ये दोन राष्ट्रीय पारितोषिकांसह ‘ग्रँडमास्टर’ हा किताब संपादन केला आहे. तिच्या या अष्टपैलू कामगिरीबद्दल ‘सिप’ अकॅडमी तर्फे तिची ‘सुपरकिड’या पुरस्काराकरिता घोषणा झाली आहे.