येथील नांदर शिवारातील विरभद्रा नदीतून चोरून वाळू वाहतूक करताना एक वाहन पकडून पोलीस पाचोड पोलिस स्टेशनकडे घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांना वाळू माफिया समजून वाटेतच गावकऱ्यांनी हल्ला केला. गावकऱ्यांनी पोलिसांना वाळूचोर समजून चोप चांगलाच चोप दिला. नांदर शिवारातील विरभद्रा नदीच्या पात्रातून एका ट्रॅक्टरमधून चोरून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस नाईक लक्ष्मण बोराडे व पोलिस शिपाई रमेश जारवाल यांना नांदर शिवारात पाठविले.

यावेळी लक्ष्मण बोराडे व रमेश जारवाल हे रात्री बारा वाजेच्या सुमारास नांदर शिवारात दाखल झाले व याचवेळी एका ट्रॅक्टरमध्ये या नदीच्या पात्रातून चोरून वाळू भरणे सुरू होते. नमूद कर्मचाऱ्यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडून पाचोड पोलिस स्टेशनकडे येत असतांना वाटेत गावकऱ्यांनी वाळू चोर समजून पोलिसांवर हल्ला केला, यावेळी काही वेळ घटनास्थळी गोंधळ उडाला होता. यावेळी पाचोड पोलिसांनी या गावकऱ्यांना सांगितले की, आम्ही वाळू माफिया नाही आम्ही पाचोड पोलिस आहे. साध्या कपड्यात आम्ही चोरून वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी आलो आहोत. यावेळी पोलिसांनी गावकऱ्यांना ओळखपत्रे दाखविले.

घटनास्थळी शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी मध्यस्थी करून गावकऱ्यांचे गैरसमज दूर केले. यानंतर पाचोड पोलिसांनी वाहन पाचोड पोलिस ठाण्यात आणले. पाचोड पोलिस ठाण्यात सहा जनांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 1) संभाजी कचरू दिवटे, रा.दावरवाडी हा एक आरोपी अटक असून 2)विकास लक्ष्मण जाधव 3)विलास उत्तम जाधव, तिन्ही रा.दावरवाडी 4) अनिल तुकाराम जाधव 5)भैय्या गंगाराम साळुंके 6) विठ्ठल आप्पासाहेब तळपे रा.नांदर हे 5 आरोपी फरार आहेत. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे. पुढील तपास पोउपनि खरड करत आहेत.