03 June 2020

News Flash

औरंगाबादेत शिवजयंतीच्या मिरवणुकीत घुसून चाकूनं भोसकून तरूणाचा खून

आरोपींना पकण्यासाठी चार पथके रवाना झाली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी राज्यात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. गावखेड्यात आणि शहरांत महाराजांची भव्या मिरवणूकीही काढण्यात आल्या. अबालवृद्ध आणि तरूणही यामध्ये मोठ्या उत्साहात सामिल झाले होते. मात्र, औरंगाबादमध्ये शिवजयंतीला गालबोट लागलं आहे. शिवजयंतीच्या मिरवणूकीत घुसून एका तरूणाची औरंगाबादमध्ये हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. श्रीकांत गोपीचंद शिंदे ( वय २o, रा. गारखेडा) असं त्या तरूणाचं नाव आहे.

मृत श्रीकांतचा भाऊ सूरज शिंदे याच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकण्यासाठी चार पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत गोपीचंद शिंदेचं सध्या बी.ए. चे शिक्षण सुरू आहे. बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत तो मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. हनुमाननगरकडून पुंडलिकनगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या मिरवणूकीत तो सहभागी झाला होता.

सुत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांतचे काही अनोळखी तरूणांसोबत जोरदार भांडण झालं होतं. भांडणानंतर श्रीकांत मिरवणूकीत सहभागी झाला होता. डीजेच्या तालावर इतर तरूणांसोबत श्रीकांतने ताल धरला. त्याचवेळी आरोपीने चाकू श्रीकांतच्या छातीत खुपसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे श्रीकांत जमीनीवर कोसळला. आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. पुंडलिकनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी चार पथके नेमण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 9:09 am

Web Title: shiv jayanti 2020 aurngabad 20 years srikant shinde dead in procession nck 90
Next Stories
1 औरंगाबादेत भाजपला धक्का; तनवाणी, बारवाल शिवसेनेत
2 विनयभंगानंतर वाद; माथेफिरूने घर पेटविले
3 शिक्षकांच्या मदतीने उत्तरपत्रिका सोडविण्याचा प्रकार; चौघांविरुद्ध गुन्हा
Just Now!
X