News Flash

शिवसेनेच्या शिवजयंतीला खासदार जाधव यांची दांडी

शिवजयंती मिरवणुकीत खासदार संजय जाधव व त्यांचे काही समर्थक सहभागी न झाल्याने पक्षांतर्गत गटबाजीच्या चच्रेस तोंड फुटले आहे. या प्रकाराची शहरात चर्चा होत असून शिवसेनेच्या

शिवजयंती मिरवणुकीत खासदार संजय जाधव व त्यांचे काही समर्थक सहभागी न झाल्याने पक्षांतर्गत गटबाजीच्या चच्रेस तोंड फुटले आहे. या प्रकाराची शहरात चर्चा होत असून शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या विषयावर बोलणेच टाळले.
शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजक आमदार डॉ. राहुल पाटील होते, तर खासदार जाधव यांच्यावर मार्गदर्शकाची जबाबदारी होती. जाधव यांची मिरवणुकीतील अनुपस्थिती ठळकपणे जाणवणारी होती. या निमित्ताने खासदार व आमदारांतील बेबनाव उघड झाला. गेल्या १५-२० वषार्ंपासून खासदार जाधव यांच्या पुढाकाराने तिथीप्रमाणे परभणीत शिवजयंती महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. दरवर्षी ही मिरवणूक भव्य व अपूर्व जल्लोषात पार पडत असे. शिवसनिकांसोबतच खासदार जाधव हेही मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होत.
यंदा शिवजयंती मिरवणुकीचे प्रसिद्धिपत्रक आमदार पाटील यांच्या कार्यालयातून निघाले. यात आयोजक म्हणून आमदार पाटील, तर मार्गदर्शक म्हणून खासदार जाधव यांचा उल्लेख होता. दरवर्षी शिवसेनेची तडाखेबंद निघणारी मिरवणूक यंदा आणखी दणक्यात निघेल असे वाटत होते. खासदार जाधव व आमदार पाटील या दोघांच्या समन्वयातून मिरवणूक निघाली असती तर या मिरवणुकीतही शिवसनिकांची अलोट उपस्थिती जाणवली असती. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. सुरुवातीला अभिवादन करताना आमदारांसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याच वेळी खासदार जाधव यांची अनुपस्थिती शिवसनिकांच्या नजरेस भरली. तथापि मिरवणुकीदरम्यान ते कुठून तरी सहभागी होतील, असाही अंदाज काहींनी बांधला. संपूर्ण मिरवणुकीत सहभागी होण्यापेक्षा किमान शिवाजी चौकात तरी या मिरवणुकीत जाधव यांची ‘एंट्री’ होईल, अशीही अपेक्षा शिवसनिक बाळगून होते. मात्र, असे काही घडले नाही.
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवारी गंगाखेड येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार जाधव यांची उपस्थिती होती. म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी ते जिल्ह्यातच होते. एवढेच नाही, तर दुपारी साडेचार वाजता एका नगरात झालेल्या शिवजयंती कार्यक्रमालाही त्यांची उपस्थिती होती. दुपारी उशिरानंतर मिरवणुकीची तयारी सुरू झाली. सुरुवातीला मिरवणुकीत सहभागी होऊ शकले असते. खासदार जाधव हे परतूरला मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी रवाना झाल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत खासदार विरुद्ध आमदार संघर्ष चालू असला, तरी तो पटलावर आला नाही. शिवसेनेत दबक्या आवाजात त्याबद्दल चर्चा होते. उघडपणे कोणीच काही बोलत नाही. खासदार जाधव यांच्या शिवजयंती मिरवणुकीतील अनुपस्थितीने पक्षीय पातळीवर काही तरी धुसफूस असल्याच्या सुप्त चच्रेला दुजोरा मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 1:10 am

Web Title: shiv sena mp sanjay jadhav absent in shivjayanti
टॅग : Mp,Parbhani,Shiv Sena
Next Stories
1 ‘शिवजयंती तिथीनुसारच साजरी होण्यासाठी सेना आग्रह धरणार’
2 पालकमंत्री मुंडे यांच्या नारायणगड भेटीवेळी महंतांसह विश्वस्त गैरहजर!
3 पाणी थांबविण्यासाठी नळकांडी बंधारा!
Just Now!
X