News Flash

शिवसेना उपतालुकाप्रमुखाची आत्महत्या; ठाण्यात जमाव

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुनील खजिनदार यांचे लग्न ठरले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिमचे उपतालुका प्रमुख तथा दौलताबाद ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील प्रकाश खजिनदार यांनी विवाहित मैत्रिणीच्या घरात गळफास लावून गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत शुक्रवारी सकाळी खुलताबाद पोलीस ठाण्यात नातेवाइकांचा जमाव एकत्र आला होता. नातेवाइकांची समजूत घालून मृतदेह ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती दौलताबादच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुनील खजिनदार यांचे लग्न ठरले होते. मात्र, त्यांचे गावातीलच विवाहित मैत्रिणीच्या घरी जाणे-येणे होते. गुरुवारीही ते त्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तेथेच त्यांच्यात सुनील खजिनदार यांचे लग्न ठरल्याच्या कार्यावरून वाद झाला. या वादातूनच खजिनदार यांनी सायंकाळच्या सुमारास मैत्रिणीच्या घरात गळफास लावला. त्याची माहिती कळताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्या ताफ्याने जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. मात्र, शुक्रवारी सकाळी मृतदेह ताब्यास घेण्यास मृत खजिनदार यांच्या नातेवाइकांनी नकार दिला. सुमारे ५० पेक्षाही अधिकच्या संख्येने जमाव दौलताबाद पोलीस ठाण्यात एकत्र आला होता. संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जमावाने केली. अखेर नातेवाइकांची समजूत घालून मृतदेह त्यांच्याकडे दिल्यानंतर सायंकाळपर्यंत सुनील खजिनदार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल होत असल्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:31 am

Web Title: shiv sena worker commits suicide zws 70
Next Stories
1 … एका वाघाची भ्रमणगाथा
2 लसीकरणाची गती संथच
3 प्रक्रियेनंतरच्या कचऱ्याचे डोंगर;  विल्हेवाटीचा प्रश्न
Just Now!
X