औरंगाबाद शहरातील जुनाबाजार येथील नंदकिशोर अहिर यांच्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा झोपाळ्यातून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. सिद्धांत अहिर असं मृत चिमुकल्याच नाव आहे. रात्री झोपाळ्यात खेळत असताना अचानकपणे तो खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर आई-वडिलांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या चिमुकल्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी सिटी चौक पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.