News Flash

स्मार्ट सिटीतील ग्रीनफिल्डसाठी खासदार खैरे यांचा वेगळा सूर!

स्मार्ट सिटीमधील ग्रीनफिल्डसाठी चिकलठाणा येथील जागा प्रस्तावित केल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी...

| December 9, 2015 03:41 am

स्मार्ट सिटीमधील ग्रीनफिल्डसाठी चिकलठाणा येथील जागा प्रस्तावित केल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी नक्षत्रवाडी आणि कांचनवाडीसाठी जोर लावणे सुरू ठेवले आहे. चिकलठाण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे अग्रेसर होते. त्यानंतर प्रस्ताव पाठविल्यानंतर खासदार खैरे यांनी वेगळा सूर लावला आहे. आयुक्त सुनील केंद्रेकर यांना लिहिलेल्या पत्रात ग्रीनफिल्डसाठी नक्षत्रवाडी आणि कांचनवाडीची जागा योग्य असल्याचे मत खैरे यांनी कळविले.
नक्षत्रवाडी व कांचनवाडी हा महापालिका हद्दीतील विकसनशील भाग असून तेथे सव्‍‌र्हे क्रमांक ९ मध्ये सरकारची ११२ एकर जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कांचनवाडी येथे मलनिस्सारण प्रकल्प सुरू होणार असून त्यामुळे सांडपाण्यावरील शुद्धीकरणाचा प्रकल्प अधिक सोयीचा होईल. त्यामुळे ७० ते ८० दशलक्ष लिटर पाणी दररोज उपलब्ध होईल. अन्य जागा शहरापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर असून त्या उंचावर असल्याने ग्रीनफिल्डचा प्रकल्प नक्षत्रवाडी व कांचनवाडी भागात करावा, अशी मागणी खासदार खैरे यांनी केली. खैरेंचा वेगळा सूर लागल्याने मात्र भुवया उंचावल्या जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:41 am

Web Title: smart city greenfield another form chandrakant khaire
Next Stories
1 गोपीनाथगडाच्या उद्घाटनासाठी अमित शहा येणार
2 तुर्किस्तानमधील विद्यापीठाकडून आठ जणांना विद्यावेतन
3 ‘आघाडीने गमावले, भाजपने कमावले’!