News Flash

मिरवणुकीत वाजणार डी. जे.; ५५ डेसिबलच्या आतच आवाज घुमणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये डी. जे. वाजविण्यास परवानगी नाकारल्यामुळे पोलीस आयुक्त आणि दलित कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिरवणुकीत वाजणार डी. जे.; ५५ डेसिबलच्या आतच आवाज घुमणार
व्यूहरचनेचा पुढचा भाग म्हणून सुशिक्षित मतदारांची मने जिंकण्यासाठीही भाजपने प्रयत्न चालवले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये डी. जे. वाजविण्यास परवानगी नाकारल्यामुळे पोलीस आयुक्त आणि दलित कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी पुन्हा दलित कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बठक झाली. त्यात पोलीस आयुक्तांनी मिरवणुकीमध्ये ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डी. जे. वाजविता येणार नाही, या अटीवर परवानगी देण्यात आली. त्यामुळे कृती समितीच्या वतीने मंगळवारी होणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तालयाच्या बॉस्केट बॉलच्या मदानावर डी. जे. लावून त्यांचा आवाज मोजण्यासाठी प्रात्यक्षिक घेतले. ध्वनी मोजण्याचे यंत्र पोलीस आयुक्तांच्या हाती देण्यात आले, त्यावेळी त्या डी.जे.चा आवाज हा ८५.४ डेसिबल एवढा आला. त्यानंतर फोअर वे स्पीकर लावण्यात आले, त्यात तो आवाज ८३.९ डेसिबल एवढा आला. त्यानंतर टू वे स्पीकर लावण्यात आले असता त्यात ५५ डेसिबल आवाज आला. त्यामुळे निवासी भागातून जाताना हेच ध्वनिक्षेपक वापरले जातील, असे निर्णय देण्यात आले. या निर्णयाचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 1:50 am

Web Title: sound of dj in rally
टॅग : Aurangabad,Rally,Sound
Next Stories
1 सचिन तेंडुलकरकडून ‘शांतिवन’ला ४० लाखांची मदत
2 परभणी जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी
3 प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे पाणी विक्रेते अडचणीत
Just Now!
X